दिवा, (आरती मुळीक परब) - शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेला आठ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. शिवसेना दिवा शहरप्रमुख, उपमहापौर रमाकांत मढवी यांनी या मॅरेथॉन चे आयोजन केले होते. सलग पाच वर्षे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, उपतालुका प्रमुख बंडू पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पाच गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत पाच किलो मीटरसाठी महिला खुल्या गटात १) प्रीती भाके २) शिवानी गोरे ३)साक्षी मोरे, पुरुष खुल्या गटात १)अभिषेक आगरे २)साहील वालूनू ३)अशान यादव हे जिंकून आले तर 9 आणि 10 वीच्या विद्यार्थी गटात दोन किलोमीटर मध्ये १)अथर्व दुर्गावणे २)गौरेश भोसले ३)आकाश शिंदे, मुली १)पूजा यादव २)अश्विनी यादव ३)सिमरन गुप्ता हे जिंकून आले, ७ आणि ८ वीच्या विद्यार्थी गटात दीड किलोमीटर मध्ये मुले १)प्रिन्स राय २)किशन निषाद ३)तनिष यादव, मुली १)गार्गी गुप्ता २)मनस्वी जयस्वाल ३)सरस्वती सिंग या जिंकून आल्या तर ५ आणि ६ वीच्या विद्यार्थी गटात एक किलोमीटर मध्ये १)निखिल दळवी २)गणेश काजबळे ३)दिव्यांश पांडे, मुली १)रिया करंबळे २)पलक पटवा ३)ज्योती यादव या जिंकून आल्या.
ह्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत एक किलोमीटर, दीड किलोमीटर, दोन किलोमीटर तर खुल्या गटासाठी पाच किलोमीटरचे अंतर होते तर ही स्पर्धा दिवा चौक ते दिवा आगासन फाटक पर्यंत पार पडली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सेवेसाठी स्थानिक डॉक्टरांचे पथक हे मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी उपलब्ध होते. याशिवाय आप्तकालीन परिस्थितीसाठी दोन रुग्णवाहिका देखील तैनात करून ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी सकाळी ७ ते १० या वेळेतील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. या स्पर्धेच्या वेळी वाहतूक पोलीस व महानगरपालिका अधिकारी देखील उपस्थित होते.
दिवा वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमधील सहभागी चारी गटातील विजेत्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात आली. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला सहभागी होणाऱ्या खेळाडूंसहित दिवेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव, माजी नगरसेविका दिपाली भगत, दर्शना म्हात्रे, उपशहर प्रमुख आदेश भगत, गणेश मुंडे, युवती शहर अधिकारी साक्षी मढवी, विभाग प्रमुख उमेश भगत, चरणदास म्हात्रे, गुरुनाथ पाटील, विनोद मढवी, शशिकांत पाटील, भालचंद्र भगत, निलेश पाटील, अरुण म्हात्रे, राजेश पाटील, जगदीश भंडारी, सचिन चौबे, विनोद पाटील सर, सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.