रेल्वे पोलीस व प्रवाशांमुळे वाचला जीव
डोंबिवली ( शंकर जाधव) : मध्य रेल्वेतील सर्वात जास्त गर्दीचे रेल्वे स्थानक हे डोंबिवली रेल्वे स्थानक आहे. मुंबईला कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी वर्गाला ट्रेनमध्ये चढताना तारेवरची कसरत करावी लागते. सोमवार २ सप्टेंबरला डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर सकाळी ८.३३ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात आलेल्या जलदगतीच्या ट्रेन मध्ये चढताना एक प्रवासी महिला फलाट आणि ट्रेनच्या गॅपमध्ये अडकल्या.फलाटावरील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली.
ट्रेन थांबवल्या नंतर डोंबिवली रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या मदतीने वीस मिनिटात त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. महिलेला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.ट्रेन मध्ये चढताना आणि उतरताना ट्रेन व फलाटममधील अंतरावर लक्ष दया असे रेल्वे पोलिसांकडून उदघोषना केली जात आहे. प्रवाशी आपला जीव संभाळून प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते.