दिवा, (आरती मुळीक परब) : शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजापूर- लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित ठाणे ते दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा परिसरातील कोकणवासीयांचा दिवा (ठाणे) येथे विजयी निर्धार मेळावा संपन्न झाला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना यांच्या वतीने निर्धार मेळाव्याला उपस्थित सर्वांनी राजापूर विधानसभेवर पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. ही निवडणूक निष्ठा विरुद्ध पैसा अशी होणार असून यामध्ये खरी निष्ठा विजयी होणार. त्यासाठी वाटेल ते करणार, अशी शपथ उपस्थित शिवसैनिक व पदाधिकारी यांनी मेळाव्यात घेतली.
निष्ठावंत शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहतील, अशी ग्वाही शिवसैनिकांनी दिली. तसेच यावेळी विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्या शिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही. त्यावेळी आमदार डॉ. राजन साळवी यांना पुढील मंत्रिपदासाठी शिवसेनेकांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, युवासेनेचे सुमित सुभाष भोईर, विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर संघटिका ज्योती पाटील, राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार, शिवसहकारचे सुधीर मोरे, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख संदेश मिठारी, युवासेना दिवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, डोंबिवली उपविधानसभा अधिकारी ऋतुनीला पावसकर, तालुका सहसंपर्क नामदेव नार्वेकर, रमेश आग्रे, शशिकांत सावंत, दिवा विभाग प्रमुख मच्छिन्द्र लाड, संजय जाधव, शनिदास पाटील,विभाग संघटिका सुहासिनी गुडेकर, संदीप भालेकर हिंगोली विधानसभा संपर्कप्रमुख, विभागसंपर्क तुळशीदास नवाळे, सुभाष तांबे, मधुकर मांडवकर, नंदू पाटकर, दिवा शाखाप्रमुख अनिकेत सावंत, विलास मुळम, प्रशांत बेर्डे, दादा धाडवे, दिलीप शिवगण, पंढरी गुरव, दिपक पाटेकर, अनिल शिंदे, विराज सुर्वे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने कोकणवासीय उपस्थित होते.