नागरिकांनी मानले पालिका आयुक्तांचे आभार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाकडून डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असल्याचे दिसते. 'फ' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त भरत पवार, पथकप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सातत्य ठेवल्याने नागरिकांनी पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांचे आभार मानले.फेरीवाल्यांनी उभारलेले अनधिकृत शेडही जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.कारवाई पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. फुटपाथवरही अतिक्रमण करून नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. तर दुकानदाराही आपले समान फुटपाथवर ठेवत होते.