लखनऊ: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुढील इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) सीझनसाठी लखनौ सुपर जायंटची धुरा सांभाळणार यावर लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रोड्स यांनी मोठे विधान केले आहे. आयपीएल २०२५ सीझरच्या लिलावाची तारीख जवळ येत आहे. त्याचवेळी रोहितच्या प्रवेशाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. अलीकडे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याची चर्चा पसरली आहे. दरम्यान, पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्ससोबत वेळ घालवणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी रोड्सने रोहित शर्माचे कर्णधार आणि सलामीवीर म्हणून कौतुक करत एलएसजीच्या यशासाठी रोहितची आवश्यकता नसल्याचे देखील जॉन्टी रोड्सने म्हटले आहे.
जॉन्टी ऱ्होड्सने प्रसार माध्यमांना सांगितले की, मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून मल रोहित शर्माला सराव आणि क्रिकेट खेळताना पाहण्याची संधी मिळाली. तो अतिशय अद्भुत आहे. रोहितच्या मैदानावरील चमकदार कामगिरीने ऱ्होड्स थक्क झाला असला तरी एलएसजीच्या यशासाठी रोहितची आवश्यकता आहे असे त्याला वाटत नसल्याचे स्पष्ट केले.
जॉन्टी रोड्स म्हणाला की, मला रोहित शर्माला फलंदाजी करताना बघायला आवडते, पण मी असे म्हणत नाही की त्याने एखाद्या संघात जाऊन संघाचा ढाचा बदलावा. त्याचवेळी राहुलच्या भवितव्याबद्दल विचारले असता ऱ्होड्स म्हणाला की, कोणत्या खेळाडूला संघात घ्यावे आणि कोणाला कायम ठेवण्याबाबत निर्णय त्याला घेता येणार नसल्याचे देखील त्याने म्हटले.