ठाणे: उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज १४८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्या पत्नी नंदिनी राजन विचारे, केदार दिघे उपस्थित होते.