नेहरू युवा केंद्र, रायगड व प्रिझम संस्थेचा उपक्रम
अलिबाग ( धनंजय कवठेकर): दिवाली विथ माय भारत या उपक्रमांतर्गत दिनांक ३० ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगर चेंढरे येथील समाज मंदिर व आजूबाजूच्या परिसराची निशांत रौतेला-जिल्हा युवा समन्वयक रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत सामाजिक क्षेत्रातील व स्थानिक महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक युवती देखील सहभागी झाले होते.