KDMC news : वेळेत मालमत्ता कर भरा व जप्ती टाळा



ऑनलाईन कर भरा व वेळ वाचवा

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आवाहन

कल्याण,  (शंकर जाधव) : मालमत्ता कर विभाग हा महानगरपालिकेच्या महसुली स्त्रोताचा महत्वाचा विभाग आहे. महानगरपालिकेची कर वसुली निर्धारीत वेळेत होणे व नागरीकांना देखिल कर वेळेत भरावा याउददेशाने महाराष्ट्र शासन महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महिला बचत गटातील महिलांमार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील कर व पाणीपटटी देयके महिला बचत गटामार्फत वाटपाचे काम देण्यात आले आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.


ज्या नागरीकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही. त्यांचेविरुध्द मालमत्ता कर विभागाचे वतीने कर वसुलीचे उददीष्ट साध्य करण्यासाठी नियमानुसार कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये, नागरीकांना जप्तीपुर्वक नोटीस देणे, मालमत्ता अटकावणीची कारवाई करणे, जप्त करण्यात आलेल्या जंगम व स्थावर मालमत्ताचा जाहीर लिलाव करणे, पाणीपुरवठा खंडीत करणे यासारखी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना आवाहन करण्यात येते की, मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे व मालमत्ता जप्ती/सिल/लिलाव यासारखी अप्रिय कटू कारवाई टाळावी.

Post a Comment

Previous Post Next Post