Railway employees: रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर


एकूण २०२८.५७ कोटी रुपयांना मंजुरी

सुमारे ११.७२ लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ


नवी दिल्ली :  रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन,  केंद्रीय मंत्रिमंडळाने ११,७२,२४० रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनस (पीएलबी) म्हणून, कामाच्या ७८ दिवसांकरता एकूण २०२८.५७ कोटी रुपयांना मंजुरी दिली.


ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी आणि इतर ग्रुप XC कर्मचारी यांसारख्या विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ही रक्कम दिली जाईल. पीएलबी साठी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी वितरीत केली जाते. यावर्षी देखील, सुमारे ११.७२ लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतकी पीएलबीची रक्कम दिली जाणार आहे.७८ दिवसांसाठी प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला दिली जाणारी कमाल रक्कम रु.१७,९५१/- इतकी आहे. ही रक्कम विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचारी, जसे ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयांच्या सेवेतील कर्मचारी आणि इतर गट 'क' कर्मचारी यांना वितरीत केली जाईल.


२०२३-२०२४ या वर्षात भारतीय रेल्वेची कामगिरी खूप चांगली राहिली. रेल्वेने १५८८ दशलक्ष टन इतकी विक्रमी मालवाहतूक केली, तर जवळजवळ ६.७ अब्ज प्रवासी वाहतूक केली. या विक्रमी कामगिरीमध्ये अनेक घटकांचा हातभार लागला. सरकारने रेल्वेमध्ये विक्रमी कॅपेक्स (भांडवली खर्च) केल्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा, कामकाजातील कार्यक्षमता आणि उत्तम तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींचा यात समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post