Rajsthan dumper accident: खडी भरलेल्या डम्परने १६ जणांना चिरडले

 


दौसा: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील लालसोट बसस्थानकावर भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने १६ जणांना चिरडले.  त्यापैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान, १० जणांना गंभीर अवस्थेत जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर संतप्त लोकांनी लालसोट मार्केट अडवून डम्परला घेराव घालून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.  

मिळालेल्या माहितीनुसार, लालसोट बसस्थानकावर खडी भरलेल्या डंम्परने १६ लोकांना चिरडले. यानंतर अनियंत्रित झालेल्या डम्परने  बसला धडकला. दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने डम्परचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मोठ्या प्रयत्नानंतर डम्परमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून १० जणांना गंभीर अवस्थेत जयपूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, एका जखमीवर लालसोट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ५ मृतदेह शवागारात ठेवले आहेत. 

या अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेनंतर संतप्त लोकांनी बाजारपेठ बंद करून रास्ता रोको केला. पीसीसी सदस्य कमल मीना आणि इतरांनी या अपघातासाठी पोलीस-प्रशासनाला जबाबदार धरले आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत या परिसरात मोठ्या वाहनांना प्रवेश मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यानंतरही मोठी वाहने गजबजलेल्या भागातून जातात. मात्र, पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post