Weather updates: तापमानात वाढ




नवी दिल्ली :  मान्सून देशातून परतत असल्याचे पडसाद दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेश (यूपी) सह अनेक राज्यांमध्ये पहावयास मिळत आहे. देशातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  सकाळी आणि संध्याकाळी गुलाबी थंडी सोबत दुपारी उन्हाचा तडाखा देखील झेलावा लागत आहे. हवामानातील या चढउतारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे.


हवामान खात्याने आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहारच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो.  उत्तर प्रदेशात मान्सूनने माघार घेतल्यानंतर उष्मा आणि आर्द्रतेमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. तर महाराष्ट्रात उन्हामुळे नागरिक त्रस्त झााले आहेत. ऑक्टोबर महिन्यात हवामान संमिश्र राहील. महिन्याच्या अखेरीस हलकी गुलाबी थंडी जाणवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात हवामान स्वच्छ राहील. सूर्य आपल्याला आणखी त्रास देत राहील त्यामुळे येथे पारा चढेल. IMD नुसार, येत्या काही दिवसांत म्हणजे नवरात्रीनंतर लोकांना सकाळ आणि संध्याकाळी थंडी जाणवेल. दिल्लीत शनिवारी पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post