रवींद्र चव्हाण व राजेश मोरे यांची उपस्थिती
डोंबिवली ( शंकर जाधव ) : दिवाळी पहाट निम्मित्त संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आयोजनातून डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवर 'यंदा मराठी वाजलंच पाहिजे' हा क्रेटेक्स डीजे कृणाल घोरपडे या प्रसिद्ध मराठी डिजे कलाकाराच्या कार्यक्रमात महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण व उमेदवार राजेश मोरे हे उपस्थित होते.
निवेदकांनी राजेश मोरे यांचे स्वागत आणि शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले असता रवींद्र चव्हाणांनी राजेश मोरे ह्यांना शाल पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही उमेदवार पाहून कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने जमलेल्या तरुणाईने जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी युवासेना कल्याण लोकसभा जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांनी दोन्ही उमेदवारांचे स्वागत केले.
यावेळी कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, राहुल म्हात्रे, महिला आघाडीच्या पदाधिकारी कविता गावंड यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.