शहापूर, ( श्रावणी कामत) : रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी, शहापूर तालुक्यातील कानविंदे या आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसोबत व पालकांसोबत युवा साहित्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त फराळ व साडी वाटप करण्यात आले.
कर्तव्य म्हटलं की जबाबदारी आली आणि जबाबदारी म्हटली की युवा साहित्य प्रतिष्ठान नेहमीच तत्पर असतं. ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हा तान्हात मोल मजुरी करावी लागते अशा दुर्गम भागात युवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात, या उपक्रमात तळेगाव येथील ॲड. धनंजय कोद्रे यांच्या कडून तेथील स्त्रियांना साडी वाटप करण्यात आली तसेच लोणावळ्यातून मुलांना फटाक्यांचे वाटप सुद्धा करण्यात आले.
याप्रसंगी केंद्र प्रमुख महेंद्र धिमते सर, ॲड. धनंजय कोद्रे सर, श्रिया रहाळकर, आशिष जांगीर , युवाचे कार्यकर्ते संतोष खरटमोल, श्रावणी कामत, गजानन परब, प्रियंका वाघुले-साबळे, ओमकार देसाई, आनंद रांजणे, कृतिका शेळके, सायेश साबळे, श्रध्दा क्लासेसचे विद्यार्थी ऋतूजा पाटील, सुजल पाटणकर, रोशन कांबळे आदी उपस्थित होते.