नर्मदा-कार्तिक ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची सगळीकडे चर्चा
कोल्हापूर: ( शेखर धोंगडे ) : आजच्या धकाधकीच्या आणि पैशाच्या मागे लागलेल्या दुनियेत, प्रामाणिकपणा- एकनिष्ठपणा मागे पडत चालला आहे, अशीच अनेकांची भावना समाजात वाढिस लागलेली असताना, त्याला "नर्मदा-कार्तिक" ट्रॅव्हल आणि त्यांचे कर्मचारी अपवाद ठरली आहेत.
प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र कटिबद्ध असलेली आणि शासनाचे सर्वोत्तपरी नियम,अटी पाळून नर्मदा कार्तिक ही ट्रॅव्हल्स एजन्सी मुंबई, लातूर, बोरिवली, ठाणे अशी सेवा बजावत आहे. मात्र, याच नर्मदा कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये कोल्हापूर-लातूर मार्गावर बुधवारी रात्री प्रमाणिकपणाचा अनुभव आला. या ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणारे धीरेंद्र प्रभा घरड यांचे महत्वाचे कागदपत्र असलेले पैशाचे पाकीट विसरले. त्यामुळे त्यांच्या मनाची चंचलता वाढली. त्यांनी तातडीने ज्या "नर्मदा-कार्तिक" ट्रॅव्हल्समधून आलो त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचा नंबर नसल्यामुळे ते थोडे अस्वस्थ झाले. तरीही त्यांनी अन्य ट्रॅव्हल्सच्या चालकाकडून नंबर मिळवला आणि त्यांना कॉल केला. दरम्यान, नर्मदा कार्तिक ट्रॅव्हल्सचे कर्मचारी ट्रॅव्हल्सची अंतर्गत सफाई करताना त्यांना ते पाकीट व कागदपत्र सापडले. त्यांनीही तत्काळ ट्रॅव्हल्सचे मालक अशोक कुचकोरवी व कार्यालयात ही माहिती दिली होती. मालकांनीही ते जपून ठेवण्याचा सल्ला दिला. इतक्यात धीरेंद्र घरड यांचाही चालकाला फोन आला. आणि आपले पाकीट सुस्थितीत व्यवस्थित आहे, येऊन घेऊन जावा असा सल्ला त्या चालकाने दिला आणि धीरेंद्र घरड यांच्या जिवात जीव आला.
धीरेंद्र गरड यांना पैशापेक्षा पाकिटमध्ये असलेली कागदपत्र अत्यंत महत्त्वाची होती. ही कागदपत्र हरवली असती तर त्यांना सातत्याने कोल्हापूर अशा फेऱ्या माराव्या लागल्या असत्या यात मानसिक त्रास व आर्थिक फटका ही सहन करावा लागला असता, मात्र नर्मदा कार्तिकचे चालक व कर्मचारी यांनी हे पाकीट प्रामाणिकपणे परत दिल्यामुळे त्यांचा पुढील त्रास वाचला. महादेव कांबळे, शरीफ शेख, सचिन ठोर, पांडुरंग नरवडे, पिंटू यादव, आणि माधव (सर्व रा. लातूर) नर्मदा कार्तिक ट्रॅव्हल्सचे चालक व कर्मचाऱ्यांनी हा प्रामाणिक जपला त्यांचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आजही या नर्मदा कार्तिक खाजगी ट्रॅव्हल्समध्ये असे चालक-मालक व कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे कटिबद्ध आहेत, हेच या घटनेवरून दिसून आले. या घटनेनंतर नर्मदा कार्तिकचे मालक अशोक कोचकोरवी यांनी देखील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी घरड यांनी नर्मदा कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये असे चालक व कर्मचारी असतील तर ही संस्था नक्कीच मोठी होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना आलेल्या या सद्भावनेच्या आणि अनुभवाची माहिती त्यांनी व्हाॅट्सॲप व फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले आहे. चालक व कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणासाठी ते बक्षीस देऊ देत असताना त्यांनी ते नाकारले. उलट कर्मचारी जिथे चहा करत होते तो चहा देखील त्यांनी पाजला व धीरेंद्र घरड यांचा पाहुणचार करत आमच्या नर्मदा कार्तिक ट्रॅव्हल्सची कायम जोडले जावा, असा संदेशही दिला. यावेळी धीरेंद्र घरड यांनी सर्वांसोबत एक सेल्फी फोटो घेत तो सोशल मीडियावर व्हायरल ही केला, त्याला अनेक चांगल्या कमेटन्स ही आल्याचे पाहायला मिळाले.