रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना मोफत फळे वाटप

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) यांच्या वाढदिवसानिमित्त युवक आघाडी डोंबिवली शहरच्या वतीने बुधवारी २५ तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गरीब रुग्णांना मोफत फळे वाटप करण्यात आले. यावेळी ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिक उघडे,

युवक आघाडी डोंबिवली शहर अध्यक्ष विकास खैरनार, संजय पवार (रिक्षा युनियन अध्यक्ष),वैशालीताई सावर्डेकर  (अध्यक्ष डोंबिवली शहर महिला आघाडी), अशोक हिवाळे (डोंबिवली शहर युवक आघाडी), शिवाजी पाटोळे (उपाध्यक्ष डोंबिवली शहर झोपडपट्टी महासंघ), संजय खैरनार, अनिल खैरनार, काशीबाई पाटोळे, विनोद चव्हाण, गंगाराम जोशी, तुषार शेळके, दीपक सोनावणे, सतीश जोशी, आकाश पाटोळे, मंगल शेळके, माया मोरे, प्रतिभाताई वावळ, अलका कांबळे, सुनीता खरात आदी उपस्तित होतें.

Post a Comment

Previous Post Next Post