स्थलांतरित कामगारांचे एड्सविषयी प्रबोधन

Maharashtra WebNews
0

 


  • युवा ग्रामीण विकास संस्था
  • असंघटित कामगारांच्या मोफत आरोग्य सेवेची १३ वर्ष
  • कामगारांचे मानसिक आरोग्याविषयी मनोधैर्य वाढवण्याचे कौशल्य
  • एचआयव्ही संसर्गिताची काळजी आणि जगण्याला आधार

कोल्हापूर,  (शेखर धोंगडे) : गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत व  कामगार वस्तीत स्थलांतरित कामगार व असंघटित कामगारांची संख्या दरवर्षी वाढते आहे. २०१२ पासून अती जोखमीच्या घटकांना  नॅको,एमसॅक्स, डापक्यू (दिशा युनिट) या शासन मान्य अनुदानित संस्थेच्या मार्गदर्शनाखाली  युवा ग्रामीण विकास संस्थेच्या, आरोग्य प्रतिबंध विभागाकडून कामगारांचे एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग, क्षयरोग , कावीळ व इतर आजाराविषयी सल्ला मार्गदर्शन, प्रबोधन केले जाते. कामगारांची कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी केली जाते. युवा एन. जी. ओ  गेली १३ वर्ष अखंडित आरोग्य  सेवा देत आहे.

जागतिक एड्स दिन व एड्स पंधरवडा निमित्त 
(Take The Right Path टेक द राईट पाथ )  मार्ग हक्काचा..सन्मानाचा या घोष्य वाक्यातून संस्थे तर्फे विविधांगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.२०३०पर्यंत एडींग एड्स संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.





एचआयव्ही विषयी  शंकाचे निरसनसाठी १०९७ ही हेल्पलाईन आहे. युवा संस्थेच्या प्रकल्प कार्यक्षेत्रात सोशल मार्केटिंग कंडोम आउटलेट सुरू आहेत. तसेच अडवोकॅसी,स्टेक होल्डर, डी. आय. सी. मीटिंग,इव्हेंट, पथनाट्य, व्याख्यान, कार्यशाळा, मधून व्यापक प्रमाणात एड्स जनजागृती केली जात आहे.

या कामी  जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकांच्या कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, जिल्हा  पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे तज्ज्ञ समुपदेशक यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.





तसेच  संस्थेचे अध्यक्ष,पदाधिकारी व प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे, प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते,समुपदेशक प्रल्हाद कांबळे, प्रदीप आवळे, आनंद सज्जन, निखिल सुतार, संग्राम पुजारी प्रतीक्षा जाधव, प्रियांका करंगळे, सामाजिक कार्यकर्ते व  पिअर लीडर यांचेही सहकार्य लाभत आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून जोखिमाच्या घटकातील व्यक्तींना एड्स विषयी मार्गदर्शन केले जाते.काही एचआयव्ही संसर्गित व  एड्स सह जीवन जगणारी माणसं भेटतात. ती माणसं कामासाठी प्रेरणा देतात.त्याचे दुःख हलके केले जाते. संकटविमोचक म्हणूनही या प्रकल्पाकडे पहिले जाते. सामाजिक संस्थेत काम करताना मिळणारे मानधन,पगार,यापेक्षा लाख मोलाची माणसं भेटत असल्याने काम करताना समाधान लाभत आहे.

मोहन सातपुते
प्रकल्प व्यवस्थापक
आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव व कागल एमआयडीसी, कोल्हापूर

असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एचआयव्ही व गुप्तरोगाची  लागण होते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला वापरलेली  सुई व सिरीजमुळे, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचे रक्त निरोगी व्यक्तीला चढवले गेले तर  गर्भवती माता एचआयव्ही संसर्गित असेल तर  तिच्या होणाऱ्या बाळाला  एचआयव्हीची लागण होते. एचआयव्ही हा  संसर्गजन्य रोग नाही . एचआयव्ही /एड्सविषयी शास्त्रीय माहिती घेणे गरजेचे आहे. औषधामुळे गुप्तरोग टाळता येतो.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)