महाराष्ट्राचे थोर निरूपणकार व सद्गुरू संपद्राय यांचे श्रद्धास्थान असलेले श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र श्री आप्पा साहेब आणि सचिन दादा धर्माधिकारी यांची त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
आप्पासाहेब यांचा वनीकरण, रक्तदान आणि वैद्यकीय शिबिरे, हुंडा प्रथा दूर करणे, महिला आणि आदिवासींचे सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि जनतेला पारंपारिक आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्यात मोलाचा वाटा आहे. अशा थोर व्यक्तिमत्वाची भेट म्हणजे साक्षात परमात्म्याची अनुभतीच म्हणावी लागेल!