इंदिरा आयव्हीएफचे १२वे हॉस्पिटल भिवंडीत



भिवंडी, ( दिलीप कालेकर ) : वंध्यत्वाने प्रभावित जोडप्यांना आता उपचारासाठी दूरच्या शहरांमध्ये प्रवास करण्याची गरज नाही. भारतातील सर्वात मोठी फर्टिलिटी ट्रीटमेंट साखळी इंदिरा आयव्हीएफने फर्स्ट फ्लोर, सूर्या एक्सीलेंसी, मौजे नारपोली, जीपी पारसिक बँकेच्या वर, भिवंडी येथे आपले अत्याधुनिक केंद्र सुरू केले आहे. हॉस्पिटलचे उद्घाटन इंदिरा आयव्हीएफ भांडुपचे वरिष्ठ कार्यकारी संचालक डॉ. रिनॉय श्रीधरन आणि भिवंडी प्रमुख डॉ. सोनम मनोज तुरकर यांनी फित कापून केले. उच्च यश दर, रुग्णाच्या समस्येनुसार उपचार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदिरा आयव्हीएफने महाराष्ट्रातील २८वे हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे. ग्रुपचे भारतात १६० पेक्षा जास्त हॉस्पिटल्स चालू आहेत. इंदिरा आयव्हीएफकडून उपचार घेऊन आतापर्यंत एक लाख साठ हजार पेक्षा जास्त जोडप्यांचे यशस्वी आयव्हीएफ प्रक्रियेतून झाले आहे.



या प्रसंगी इंदिरा आयव्हीएफ ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक डॉ. नितिज मुर्डिया म्हणाले, “आम्ही भिवंडीमध्ये आमचे नवीनतम हॉस्पिटल सुरू करून आनंदित आहोत, जेणेकरून कुटुंब पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांना अत्याधुनिक उपचार सहाय्य प्रदान करता येईल. आकडेवारीनुसार, भारतात १०-१५ टक्के जोडपी वंध्यत्वाशी झुंजत आहेत. इंदिरा आयव्हीएफचे मिशन अशा जोडप्यांमध्ये वंध्यत्वाशी संबंधित चुकीच्या माहिती आणि धारणांना दूर करणे आणि योग्य माहितीचा प्रसार करण्यात मदत करणे आहे. आम्हाला समजते की वंध्यत्व जोडप्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते आणि म्हणूनच आम्ही एकाच छताखाली सर्व वंध्यत्व उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”


इंदिरा आयव्हीएफ भांडुपचे वरिष्ठ कार्यकारी संचालक डॉ. रिनॉय श्रीधरन म्हणाले की, भारतात फर्टिलिटी उपचारांबद्दल जागरूकता खूपच मर्यादित आहे. ६ पैकी १ जोडप्याला संतती प्राप्त करण्यात समस्या येतात. हे समजणे आवश्यक आहे की वंध्यत्वासाठी महिला-पुरुष दोघेही किंवा दोघेही जबाबदार असू शकतात. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नोलॉजी पुरुष आणि महिला दोघांनाही पालक बनण्याच्या प्रवासात सहकार्य करण्यासाठी योग्य उपचार सुविधा प्रदान करते.


आयव्हीएफ प्रक्रियेबद्दल सांगताना, इंदिरा आयव्हीएफ भिवंडी प्रमुख डॉ. सोनम मनोज तुरकर म्हणाले की, आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी जोडप्यांना विविध पर्याय आणि परिणामांबद्दल सल्ला दिला जातो. त्यानंतर वंध्यत्वाचे कारण निश्चित करण्यासाठी आणि उपचार योजना तयार करण्यासाठी दोघांची चाचणी केली जाते. ओव्हेरियन स्टिम्युलेशन, अंडे काढणे, वीर्य संकलन, निषेचन, भ्रूण विकास, भ्रूण स्थानांतरण आणि नंतर गर्भधारणेची चाचणी ही सर्व महत्त्वाची टप्पे आहेत जी आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान पाळली जातात.


 ग्रुपने महाराष्ट्रासह देशभरातील जोडप्यांना एविडेंस बेस्ड उपचाराने आश्वस्त करण्यासाठी लाइफ व्हिस्पररच्या सहकार्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंससह अनेक नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक केली आहे. इंदिरा आयव्हीएफ भिवंडी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी संपूर्ण जानेवारी महिन्यात मोफत वंध्यत्व सल्लामसलत आयोजित केली जात आहे ज्यामध्ये जोडपी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वंध्यत्व संबंधित सल्ला घेऊन उपचाराच्या दिशेने पाऊल उचलू शकतात.







Post a Comment

Previous Post Next Post