महापारेषण आणि एमएमआरडीएच्या कामाचा परिणाम
ठाणे, ( रिना सावर्डेकर ) : एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पासाठी महापारेषणच्या २२० केव्ही खारबाव-कोलशेत, २२० केव्ही रोमा-कोलशेत, १०० केव्ही पडघा-कोलशेत १०० केव्ही वसई-कोलशेत या चारही लाईन स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोलशेतच्या पातलीपाडा उपकेंद्रातून महावितरणच्या विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (शनिवार दि. १८ जानेवारी ००.०० ते ०१.००) या एक तासाच्या कालावधीसाठी खंडीत केला जाणार आहे.
महावितरणच्या वागळे इस्टेट विभागातील (ठाणे शहर) वसंतविहार, म्हाडा, लोकपुरम, धर्मवीर नगर, लोक उपवन, नळपाडा, गांधी नगर, जवाहर नगर, हिरानंदानी मेडोज, गार्डन इस्टेट, हिल गार्डन, कोठारी, हाइड पार्क, नीलकंठ, टिकुजीनी वाडी रोड, मानपाडा, ब्रम्हांड, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, समता नगर, डोंगरीपाडा, वाघबीळ नाका, कावेसर, आनंद नगर, लोढा, कासारवडवली, हावरे सिटी, ओवळा या भागातील विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. या परिसरातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.