अलिबाग, ( धनंजय कवठेकर ) : जिल्हाप्रमूख सुरेंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नाने व जिल्हापरिषद सेस फंडाच्या माध्यमातून चौल भगवती अंतर्गत रस्त्याचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षापासून रखडलेला अंतर्गत रस्त्याचे आज दि.२ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला. चौल भगवती अंतर्गत रस्त्याचे १६० मिटर रुंदी असलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यात येत आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, सदस्य अतुल वर्तक, अजित मिसाळ, सचिन भोईर, कल्पेश थळे, गणेश मगर, निलेश माळी, आशिष थळे, योगेश गुरव, सुधीर नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.