Maharashtra weather : नवीन वर्षात तापमानात घट होण्याची शक्यता


पुणे :  नवीन वर्षात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार आहे. तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. पुढील काही दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली असून त्याचबरोबर मुंबईतील हवामानातही बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


IMD मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले की, मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) २०० च्या वर गेला होता पण कालपासून ते १४० च्या आसपास आहे जे मध्यम श्रेणीत मोडते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील तापमानात झपाट्याने घट होणार असून गुरुवारपर्यंत किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर आठवड्याच्या शेवटी मुंबईचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.


पश्चिमेकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून वाहणारे थंड वातावरण यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे. दक्षिणेकडील किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र आणि समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ढगाळ आणि थंड वातावरण निर्माण झाले आहे. पुढील २४ तासांत ही स्थिती बदलू शकते, परिणामी थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post