अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या एकाला अटक


डोंबिवली ( शंकर जाधव ) :   डोंबिवलीत एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव जितेंद्र सिंग ( १९ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दोन विद्यार्थीनी ट्यूशनसाठी गेल्या होत्या. ट्यूशन टीचर क्लासमध्ये नव्हती, मात्र तिचा भाऊ घरी होता. त्याने परिस्थितीचा फायदा घेत एका मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर  लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या त्या पीडित मुलीने घरी आल्यावर आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यावर गेल्यावर पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानंतर वैभवला अटक केली.  




Post a Comment

Previous Post Next Post