डोंबिवली ( शंकर जाधव ) : पूर्वेकडील नांदिवली क्रॉस रोड येथील एकता मित्र मंडळ माध्यमातून नुकताच श्री नवचंडी महायज्ञ २०२५ सोहळा समाजमंदिर पटांगणात आयोजित केला होता. या धार्मिक कार्यक्रमासाठी एकता नगर मधील सुमारे पंचवीस यजमानांनी सहभाग घेतला होत. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्याचा रात्री महाप्रसादानंतर समारोप झाला. सदर श्री नवचंडी महायज्ञ सोहळ्याच्या महाप्रसादाचा लाभ परिसरातील सुमारे अकरा हजार भक्तांनी घेतला अशी माहिती एकता नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष वाळके यांनी दिली.
एकता मित्र मंडळ माध्यमातून अशाच प्रकारचा सोहळा बारा वर्षांपू्वी म्हणजे २००३ रोजी करण्यात आला होता. यावर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्री नवचंडी महायज्ञसाठी सुंदर अशी देवीची प्रतिमा साकारण्यात आली होतो. महायज्ञसाठी महिलांनी स्वतः पटांगण शेणाने सारवून काढले होते. त्यानंतर त्यांनी छान-सुंदर रांगोळ्याही स्वतः काढल्या होत्या. शहरात गाईचे शेण मिळविण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावा लागला मात्र मंडळातील पदाधिकारी सुभाष वाळवे, रोहिदास साठे, उल्हास दळवी, केशव परब, सुधीर थोरात, नाथा जाधव, सुनीता पोवार, भास्कर चौधरी, अशोक कांबळे, दिपश्री पितळे, निलेश हटकर यांच्यासह महिला समिती, युवा समिती आणि सक्रिय कार्यकर्ते यांच्यामुळे सहज शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या कार्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवली नाही.
एकता मित्र मंडळ माध्यमातून नेहमी सामाजिक बांधिलकी जपली जाते. मंडळ माध्यमातून प्रत्येकवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रक्तदान शिबीर याव्यतिरिक्त अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. गणेशोत्सव प्रत्येक वर्षी गणपती डेकोरेशन माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षीही मंडळाने गणेशोत्सवात डोंबिवलीतील केमिकल कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोटाचा देखावा दाखवून हे धोके थांबविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले होते. परिणामी अशा मंडळाच्या उपक्रमाला स्थानिकांचा नेहमीच भरभरून पाठिंबा मिळतो असे अध्यक्ष वाळके यांनी सांगितले.