दिव्यात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात



समर्थ प्रतिष्ठान दिवा आणि वीर हनुमान गोविंदा पथक, दिवा यांच्या संयुक्त उपक्रम 


दिवा, (आरती परब) :  दिव्यातील समर्थ प्रतिष्ठान दिवा आणि वीर हनुमान गोविंदा पथकदिवा यांच्या संयुक्त आयोजनात भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे हे चौथे असून या स्पर्धा तीन दिवसीय होत्या तर याच ५५ किलो वजनी पुरुष गट, ६५ किलो वजनी पुरुष गट आणि महिला गट या तीन वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धा झाल्या. ५५ किलो वजनी पुरुष गटाचे पहिल्या दिवशी टीम तर ६५ किलो वजनी पुरुष गटाचे ८ टीम खेळल्या. अशा एकूण २० टीम खेळल्या. दुसऱ्या दिवशी पण पहिल्या दिवसासारख्याच पुरष गटांच्या स्पर्धा झाल्या असून दुसऱ्या दिवशी ही एकूण २० टीम खेळल्या. तर स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला ८ टीमच्या स्पर्धा झाल्या.
 

या स्पर्धेत ५५ किलो वजनाच्या पुरुष गटात पहिले पारितोषिक पंचविस हजारचषक हे ओवी स्पोर्ट्सबिरवाडीमहाडदुसरे पारितोषिक पंधरा हजारचषक हे किंग ब्रदरटिटवाळातिसरे पारितोषिक दहा हजारचषक हे प्रियांश स्पोर्ट्सकोलाडचौथे पारितोषिक दहा हजारचषक हे प्रहलाद पाकर्सविरार यांना मिळाले. तसेच ६५ किलो वजनाच्या पुरुष गटात पहिले पारितोषिक पंधरा हजारचषक  हे प्रणव पँथर्सदिवादुसरे पारितोषिक दहा हजारचषक हे श्रीमानाईखेडतिसरे पारितोषिक पाच हजारचषक हे टोच्या बॉईजचौथे पारितोषिक पाच हजारचषक हे ओवी स्पोर्ट्सबिरवाडीमहाड यांना मिळाले. या स्पर्धेतील महिला गटातील  पहिले पारितोषिक सात हजारचषक हे शिवकन्यापालघरआणि दुसरे पारितोषिक पाच हजारचषक हे प्रणव पँथर्सदिवा यांना दिले गेले. स्पर्धेच्या सर्वात शेवटच्या दिवशी आठ लकी ड्रॉ विजेत्यांना चांदीची अंगठी श्री राम ज्वेलर्स कडून देण्यात आली. 





या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा मॅटवर खेळवण्यात आल्या. या स्पर्धेस नागरिकांबरोबर क्रीडा रसिक महिला वर्ग यांचा ही उदंड प्रतिसाद मिळाला.   या स्पर्धेला प्रमुख पाहुणे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरेदिवा शहर प्रमुखमाजी. उपमहापौर रमाकांत दशरथ मढवीसाक्षी मढवी दिवा शहर युवती अधिकारीदर्शना चरणदास म्हात्रे नगरसेविकादीपक जाधव नगरसेवकविभाग प्रमुख उमेश भगतसमाजसेवक उमेश पाटीलपंकज बोबडेसोपान म्हात्रेरुपेश मढवी यांनी भेट देऊन मंडळाला स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले तसेच मंडळाला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  




यावेळी स्पर्धा समर्थ प्रतिष्ठान दिवा या टीममध्ये सौरभ सावंत, नवनीत सावंत, आदित्य मोरे, हर्षल शेडगे, अमन रेमजे, ओंमकार भाईजे, समर्थ कदम, गौरव सावंत, प्रणव शिंदे, अक्षय कांबळे, साईल शिरिसकर, स्वप्निल सुर्वे, शुभंम पवार, संदेष सोनार, साईल उपडे, अमित परर्शाराम, तन्मय सावंत, विघ्नेश बळकटे, विघ्नेश मोरे, सार्थक कदम, पार्थ पांचाळ, अनिकेत दुधाने, साई पाटील, क्रिश पोळेकर, राघव भारद्वाज, सनी शेडगे, अजय पाटील, प्रथमेश भोसले, प्रणय चव्हाण, अनिश मोरे, अर्थव काटकर, ओंकार जाधव, प्रसन्न बाकाडे यांनी स्पर्धेसाठी खुप मेहनत घेतली. तसेच या स्पर्धेला प्रदिप माने, अक्षय म्हसकर, नितेश पेडणेकर हे पंच लाभले. 





Post a Comment

Previous Post Next Post