जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचा २३७ जणांनी घेतला लाभ



दिव्यातील दिवा हायस्कुलमध्ये उपक्रम संपन्न 


दिवा, (आरती परब)  : दिव्यातील दिवा हायस्कुल मध्ये जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फ आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २३७ जणांनी रक्तदान केले. महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. त्या
प्रमाणे यावर्षी देखील दिनांक ४ ते १९ जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २१७ जणांनी रक्तदान केले. त्याचबरोबर, कल्याण पश्चिममध्ये १६४, टिटवाळा येथे १६६, डोंबिवली पश्चिम येथे २२०, दिवा येथे २३७, डोंबिवली ग्रामीणमध्ये १५५ त्याचबरोबर भिवंडी पूर्व येथे १०४ तर पश्चिममध्ये ११० जणांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली.


जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक ४ ते १९ जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सिकलसेल अॅनेमिया, हिमोफिलीया, चॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. कल्याणसह टिटवाळा, डोंबिवली, भिवंडी परिसरात ५ ते १९ जानेवारी या कालावधीत विविध २१ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. 






Post a Comment

Previous Post Next Post