अंबरनाथ, (आरती परब)- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी सातपाने गावचे माझी सैनिक नाईक बंडू सिताराम शेलार यांचे सुपुत्र नायब सुभेदार गणेश बंडू शेलार यांची आर्मी मध्ये 24 वर्ष सेवा देऊन आपल्या मायदेशी परतले. या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांची अंबरनाथमध्ये भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या मिरवणुकीत नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळी, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळी सुद्धा उपस्थित होती.
मिरवणुकीच्या शेवटी नायक सुभेदार गणेश बंडू शेलार यांनी आपल्या सेवानिवृत्ती मिरवणुकीत आलेल्या ज्येष्ठ मंडळी तसेच नातेवाईक यांचे चरण स्पर्श करून आपल्या गृह संकुल मध्ये प्रवेश केला. गृह संकुल मध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच हॉलमध्ये सेवा निवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शेलार कुटुंबीयातील निवृत्ती झालेले सर्व माजी सैनिक सुद्धा या सत्कार समारंभाला उपस्थित होते. त्याचप्रमाणे नायब सुभेदार गणेश बंडू शेलार यांचे छोटे बंधू नरेश (बुवा) शेलार यांच्या समवेत खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर या संस्थेचे सचिव निलेश पाटणे, प्रवक्ता प्रवीण उतेकर, कार्याध्यक्ष संतोष निकम, सहसंपर्कप्रमुख अशोक कदम, कमिटी सदस्य सुधीर चोरगे इत्यादी मंडळी उपस्थित रहावुन संस्थेच्या वतीने नायब सुभेदार गणेश बंडू शेलार यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित सर्व माजी सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर या संघटनेची सातवी दिनदर्शिका प्रकाशीत करण्यात आली. संघटनेचे प्रवक्ता प्रवीण उतेकर यांनी नायब सुभेदार गणेश बंडू शेलार यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.