मा.आमदार राजू पाटील व मा.नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या हस्ते भूमिपुत्र प्रतिष्ठाणच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

 



दिवा,  (आरती परब) : भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. आमदार राजू रतन पाटील आणि दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व ठामपा माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मध्य रेल्वेच्या माटुंगा कारखान्यातील भूमिपुत्र कामगारांनी एकत्र येऊन समाजहितासाठी स्थापन केलेले हे 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' असून विविध सामाजिक उपक्रम याद्वारे राबवित असतात.


या प्रसंगी प्रतिष्ठानचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. मा.आमदार राजू पाटील व बाबाजी पाटील यांचे सहकार्य नेहमीच लाभत असते. राजूदादांनी व बाबाजी पाटील यांनी आपला अमूल्य वेळ दिला, मनमोकळ्या गप्पा मारल्या व प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक कार्याची माहिती घेऊन आजवरच्या कामाचे कौतुक करत पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार यावेळी सदस्यांनी भावना व्यक्त केल्या.




Post a Comment

Previous Post Next Post