नवी मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार जनसंपर्क कार्यालयाची स्थापना

 



  • शिवसेनेच्या मध्यवर्ती व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संपन्न 
  • जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द रहा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
  • जनतेत राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार -   खा. नरेश म्हस्के 


नवी मुंबई : नव्या विमानतळाच्या उभारणीमुळे नवी मुंबईमध्ये लोकसंख्या आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामुळे मूलभूत गरजांवर भर देणे गरजेचे आहे. तसेच नवी मुंबईतील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी नवी मुंबईत देखील खासदार जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी नवी मुंबई येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती व जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.


नवी मुंबईतील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी खासदार जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाशी प्रत्यक्ष संपर्क वाढवून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः दर पंधरा दिवसांत एकदा या कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या समस्या थेट ऐकून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे खा. नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. 



जनतेचा विश्वासच आपली खरी ताकद आहे. जनता तुम्हाला निवडून देते, तेव्हा तिच्या विश्वासाला पात्र राहणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे.त्यामुळे सर्वांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द रहा असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनो प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून दिला. 


नव्या विमानतळाच्या उभारणीमुळे नवी मुंबईमध्ये लोकसंख्या आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामुळे पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत गरजांवर भर देणे गरजेचे आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे या भागात पाण्याची समस्या दूर करण्यासाठी नवीन धरणांची गरज असून त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदारांनी केली.




या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकासाठी माझे दार सदैव उघडे राहणार आहे. येथे कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. जनतेचा आशीर्वाद आणि शिवसेनेच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून मी नवी मुंबईतील सर्वसामान्य माणसासाठी सातत्याने काम करत राहीन.


या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनात ठाणे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी अथक परिश्रम घेतले. त्याचबरोबर यावेळी आमदार मनीषा कायंदे, नवी मुंबई येथील शिवसेनेचे विजय चौघुले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरोज पाटील, शितल कचरे आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.




#Nareshmhaske #eknathshinde #newmumbai #shivsena #khasdar #VijayChougule

Post a Comment

Previous Post Next Post