अंबरनाथ, ( अशोक नाईक ) : बुधवार १९ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने अंबरनाथ प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिकेच्या वतीने अंबरनाथ शहरामध्ये "जय शिवाजी - जय भारत" पदयात्रा आयोजित करण्यात आली. अंबरनाथ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ, (पुर्व) येथे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्या उपस्थितीत "जय शिवाजी - जय भारत" पदयात्रा "छत्रपती शिवाजी महाराज" चौक अंबरनाथ, (पुर्व) येथुन हुतात्मा चौक, रेल्वे ओव्हर ब्रीज मार्गे, मटका चौक, कल्याण - बदलापूर रोड मार्गे महात्मा गांधी विद्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी पदयात्रेत सहभागी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्याधिकारी उमेश राऊत, तसेच सन्माननीय माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, गटनेते, पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पालिका शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व पत्रकार तसेच अंबरनाथ शहरातील नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अंबरनाथ नगरपालिकेच्या तळमजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, शिक्षण विभागाच्या अधिकारी जयश्री धायगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.