मुंबई, (आरती परब) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती माटुंगा कारखान्यात नॅशनल रेल्वे मजदुर युनिनच्या वतीने धुमधडाक्यात यावर्षी साजरी करण्यात आली. या महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त नॅशनल रेल्वे मजदुर युनियनतर्फे १५ आणि १७ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात माटुंगा मध्य रेल्वेच्या २०१ कर्मचाऱ्यांनी जे. जे. महानगर रक्तपेढीस रक्तदान केले.
रक्दान शिबिरात स्टाफ बेनिफिट फंड, महावीर इंटरनॅशनल, ट्रेंड सेटर यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणुक रेल्वेच्या माटुंगा कारखान्यात काढण्यात आली होती. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचे आदरनीय महामंत्री कॅाम. वेणू पी नायर यांनी कार्यक्रमात सर्वांना संबोधीत केले. नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे कामकाज हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आदर्श समोर ठेवुनच चालविले जाते. तसेच “सर्वधर्म समभाव” या महत्वाच्या विचारावर आधारीत आहे हे युवकांना पटवून दिले. भव्य मिरवणुकीत नॅरेमयुचे सहाय्यक महामंत्री कॅाम.शाम नायक, कार्याध्यक्ष कॉम. विनय सावंत तसेच नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे माटुंगा यांत्रिक शाखा आणि विद्युत शाखेचे कॉम. महेश मुंडे, कॉम. अमित गुप्ते, कॉम. प्रशांत पाटील,कॉम. विक्रम म्हात्रे, कॉम. मयुरेश राऊळ, कॉम. निरज सिंग, कॉम. धिरज वैद्य, कॉम. कविकिरण, कॉम. निळकंठ, कॉम. नितीन म्हात्रे, कॉम. सचिन व इतर पदाधिकारी तसेच सर्व कार्यक्रते यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.