कुंभमेळा हा गुरू ग्रहाच्या भ्रमणावर तो कुठल्या राशीत, नक्षत्रात प्रवेश करतो त्यावर आधारित आहे. ज्यावेळेस कुंभ राशीत प्रवेश करतो त्यावेळेला हरी की पावडी हरिद्वार येथे कुंभमेळा होतो. यावेळेस सिंह राशीत प्रवेश करतोय त्यावेळेला नाशिक आणि उज्जैन येथे कुंभमेळा भरतो. ज्या वेळेला मेष राशीमध्ये गुरुप्रवेश करतो त्यावेळेला प्रयाग येथे कुंभमेळा व गुरुचा सूर्याभोवतीचा भ्रमणकाकाल बारा वर्षाचा आहे. साधारण बारा वर्षानंतर गुरू त्या राशीमध्ये परत प्रवेश करतो त्यामुळे त्या वेळेस कुंभमेळा भरत असतो. पौराणिक मान्यतेप्रमाणे समुद्रमंथन जो अमृत कलश निघाला त्यावरून दैव आणि दैत्यांचे बारा दिवस युद्ध झाले आणि या युद्धाच्या दरम्यान चार स्थानी कुंभातील अमृताचे थेंब हे पडले आणि म्हणून या चार स्थानी कुंभमेळा असतो. यावर्षी मेष राशीत गुरूने प्रवेश केल्यामुळे प्रयाग येथे मकर संक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत कुंभमेळा भरला आहे .
कुंभमेळामध्ये देशभरातील साधू, संत ही पर्वणी साधण्यासाठी प्रयाग येथे एकत्र येतात संपूर्ण कुंभाचा कालखंडामध्ये ते तिथे ध्यानधारणा तपश्चर्य करतात. पूर्ण काळ तिथे राहण्यास कल्पवास असे म्हणतात. नागा साधूंचा हजारो वर्ष एक संघटनात्मक ढाचा आहे, या ढाच्यालाच आखाडा असे म्हणतात. आपल्याकडे प्रामुख्याने १३ आखाडे आहेत. हे नागा साधू आखाड्यांशी संलग्न असतात व आखाड्यांच्या शिस्तीमध्ये ते राहतात. ज्याला दीक्षा घ्यायची आहे त्याला जिवंतपणे स्वतः स्वतःचे श्राद्ध करावे लागते. त्यांचे जीवनही अतिशय कष्टमय असते या कुंभमेळामध्ये जवळपास दहा हजारच्यावर लोकांनी दीक्षा घेतली आणि जवळपास चार लाख नागा साधू जुना आखाड्याशी संलग्न आहेत असेही समजते. अनेक साधुसंत शिक्षित असतात त्यांचे धर्माबद्दलचे तत्वज्ञानाचे ज्ञानही अफाट असल्याचे दिसून आले.
परंतु आपण मात्र त्यांची चेष्टाच करतो. मेळा म्हटला की हौशे नवशे सर्वच तिथे येत असतात. चॅनेलवाले पण अशाच लोकांना प्रसिद्ध देतात व आपली आपल्या संत समाजाबद्दल चुकीची धारणा निर्माण होते. खऱ्या तपस्वींचे दर्शन घ्यायचे असेल तर अशा आखाड्यांमध्येच जावे लागते. नागा तपस्वी साधू संन्यास घेत असताना सर्व संसारिक अधिकारांचा त्याग केला.फक्त कुंभातील पहिल्या स्नानाचा अधिकार स्वतः जवळ ठेवण्यात आला. प्रयागराज महाकुंभातील गर्दी पाहून, हा अधिकार ही सोडून दिला आणि जगभरातील इतर भाविकांनी स्नान केल्यानंतर स्नान करण्याचा निर्णय घेतला.
या वेळेला मी मौनी अमावस्येच्या पर्वानिमित्त कुंभामध्ये आलो होतो आणि अग्नी आखाड्यामध्ये राहण्याचे भाग्य मला लाभले. आम्हास्नीच्या अमृत स्नानासाठी या आखाड्याबरोबरच जायचे ठरले होते परंतु रात्रीची दुर्दैवी घटना झाली आणि सरकारने या आखाड्यांचा अमृत स्नान रद्द केले. खरे म्हणजे अमृत्स्नान हा या आखाड्यांचा साधू-संतांचा असे म्हटले तर मान मानाचा अधिकार असतो. परंतु कुठेही गोंधळ न होता, सर्व साधू - संतांनी हा निर्णय लगेच मान्य केला. त्यावरून त्यांची समाजाबद्दलची आपुलकी श्रद्धा आणि आखाड्यातील शिस्त लक्षात येते.
भागवत कथा, राम कथा, प्रवचन अशा धार्मिक उपक्रमाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था संघटनांनी तिथे फ्री मेडिकल चेकअप फ्री डोळे तपासणी लोकांना चष्मा काढून देणे असे विविध उपक्रम राबवल्या जातात. तिथे बौद्ध महाकुंभ, खेळ महा कुंभ ,जनजाती महाकुंभ अशा प्रकारचे पण विविध उपक्रम गेल्या महिन्याभरात तिथे राबवले गेले. धार्मिक,सामाजिक,सेवा उपक्रमही आपल्याला तिथे अनुभवायला मिळतात.
कुंभ २२ सेक्टर मध्ये विभागला गेला आहे काही सेक्टर हे आखाडे ,शंकराचार्य मठ,संस्था, संघटना ह्याच्यासाठी राखीव आहेत तर काही सेक्टर मध्ये हे सशुल्क लोकांना राहण्याची सोय केली आहे.सर्व आखाड्या त्यांचे भाविक आणि सामान्य लोकांसाठी आखाड्यांनी राहण्याची निशुल्क व्यवस्था केलेली आहे अनेक लंगर लाखो लोकांना निशुल्क भोजन तिथे उपलब्ध करून देत असतात.
मोनी अमावस्येला एवढे करोडो लोक एकत्र आले होते परंतु कुठेही अस्वच्छता नव्हती मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक संडासची सोय उपलब्ध करून दिलेली आहे कुठेही घाण किंवा वास येत नव्हता रस्त्यावरून जाण्यासाठी वाळू मधून चालता यावे म्हणून पत्र्याच्या शीट टाकल्या आहेत .वाळू मोठ्या प्रमाणावर उडते म्हणून त्यावर पाणी मारले जात होते. गर्दीचे व्यवस्थापन आहे उत्तम प्रकारे केले जात होते पोलिसांचे वागणे कुठेही अरेरावीचे, दमदाटीचे नव्हते कामाचा लोड असूनही पोलिसांना शांतपणे काम करताना बघून मला आश्चर्यच वाटले.
एवढी गर्दी असूनही धक्का लागला म्हणून कोणी कोणाशी भांडत नव्हते ट्रॅफिक असतानाही इतर वेळेस दिसणारी ट्रॅफिक तोडण्याची मानसिकता कुठे दिसत नव्हती सर्वगाड्या शांतपणे रांगेत उभे राहत होते. एवढी गर्दी असूनही कुठे भाव वाढ करण्याची वृत्ती दिसत नव्हती पाण्याची बाटली वीस रुपयाला पुरी भाजी वीस रुपये चहा पाच रुपये इतके स्वस्त आहे. फेरीवाले दुकानदार याचबरोबर गंध लावणारे टू व्हीलर वाले रिक्षावाले रिक्षावाले अशा सर्व सामान्य लाखो लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.
कुंभामध्ये असेतू हिमाचल पसरलेल्या भारताचे दर्शन घडते प्रत्येक राज्यातील भाविक कुंभात येतात कुठली उच्चनीचता भाषा भेद जातीभेद आपल्याला कुंभात आढळत नाही इतर ठिकाणी असलेला गर्दीचा उन्हातही उन्हामध्ये दिसत नाही सर्वांमध्ये एक सात्विकता असते आत्मीयता असते एकमेका एकमेकांना मदत करण्याची भावना असते. उपास येणारा सर्वांना १५-२० पंचवीस किलोमीटर हे पायी चालत जावे लागते, अनेक जण रात्री प्रचंड थंडीमध्ये गार पाण्यात डुबकी मारतात धक्काबुक्की असूनही कोणाला त्रास होत नाही चेहऱ्यावरती एक आत्मिक समाधान आपल्याला बघायला मिळते. जो तिथे नुसता पर्यटक म्हणून गेलाय त्याला गर्दीचा त्याला जामचा त्याला थंडीचा त्रास होतो.जो भाविक आहे त्याला मात्र गंगेमध्ये अमृतस्नान करून आत्मिक समाधान मिळते.
महाशिवरात्रीचे शेवटचे अमृत स्नान असल्याने धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, सेवा कुंभात हजेरी लावून त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्याचे पुण्य करावे.
चंद्रकांत किसन बामणे
लेखक