भाजप वाहतूक सेल जिल्हाध्यक्षांची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहन हाय सेक्युरिटी नंबर प्लेट (HSRP)बसवणे बंधनकारक केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी वाहनामुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी, छेडछाड आणि बनावटी गिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यावर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनची ओळख पटविण्या कामी अशा अनेक प्रकारचे गैरप्रकार आळा घालण्यासाठी मोटर वाहनावरील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट(HSRP) बसवणे अत्यावश्यक आहे. पण सेंटर कुठे असतील ? कुठल्या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे ? ही सर्व माहिती प्रत्येक शहरामध्ये दर्शनी भागात फलक लावून दिली पाहिजे. तसेच रिक्षाचालकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे अशी मागणी भारतीय जनता पार्टी कल्याण वाहतूक सेल जिल्हाअध्यक्ष दत्ता माळेकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व परिवहन आयुक्तांकडे केली आहे.
भाजपा कल्याण वाहतूक सेलचे जिल्हाअध्यक्ष माळेकर, उपाध्यक्ष नंदू परब यासह रवि जाधव, खजिनदार संतोष आतकरे, प्रमोद गुरव, संजय प्रजापती, संजय चेके, बाबू साळवे यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 1 फेब्रुवारी 2025 पासून मुंबई महानगर सह उपनगर प्रादेशिक परिवहन विभागातील ऑटो रिक्षा टॅक्सी भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. एक फेब्रुवारी २०२५ पासून मीटरच्या कॅलिब्रेशनच्या कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. परंतु आठवडा झाला तरी मीटर कॅलिब्रेशन संदर्भात कुठलीही हालचाल झालेली दिसत नाही. मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या संस्थांचे नाव व पत्ते ऑटो रिक्षा टॅक्सीचालकांना उपलब्ध करून द्यावेत तथा सदर मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या संस्थेकडे अधिकृत परवाना वैद्य ट्रेड सर्टिफिकेट आणि आपल्या कार्यालयाने घालून दिलेल्या नियमानुसार सर्व बाबी दर्शनी भागास लावण्यात याव्यात व त्या उपलब्ध आहे की नाही यासंदर्भात माहिती देखील उपलब्ध व्हावी. मीटर कॅलिब्रेशनचे दरावर बंधन असावे. कारण आमच्या माहितीनुसार मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या संस्थेचे चालक मनमानी पद्धतीने रिक्षाचालकाकडून आकारणी करत असतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे. म्हणून आपण त्याच्यावरती जातीने लक्ष ठेवावे. रिक्षाचालकाची लूट होता कामा नये, अशी संघटनेच्या वतीने मागणी करीत आहोत.
त्याचप्रमाने एक वर्षापूर्वी गॅस बाटला टेस्टिंग चे दर ७०० रुपयावरून डायरेक्ट २२०० झाले होते असेच दर दोन वर्षांपूर्वी वाढले होते तेव्हा संघटनेकडून आंदोलनाची हाक दिल्यानंतर आपण ते दर २२०० वरून ७०० ते ८०० रुपयावर आणले आता तशीच परिस्थिती रिक्षा चालकांवर ओढवली आहे २८०० रुपये दर बाटलास टेस्टिंग संस्थाचालकांनी सर्रास घेण्यास सुरुवात केली आहे आपणही याच्यावर बंधन/अंकुश ठेवावा संबंधित संस्था चालकांना बोलून पूर्वी ७०० ते ८०० रुपये असलेले दर आता एकदम २८०० रुपयावर कसे गेले याचा खुलासा करून याच्यावर नियंत्रण आणावे, अन्यथा आमच्या संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असे संघटनेने सूचित केले आहे.