चित्रपट पाहून डोंबिवलीकर प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू
डोंबिवली ( शंकर जाधव ) : छत्रपती सांभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट देशभरातील थिएटर प्रदर्शित होत आहे. डोंबिवलीकरांना हा चित्रपट पाहता यावा याकरिता त्यांनी शिवसेनेकडे मागणी केली होती. डोंबिवलीकर प्रेक्षकांच्या मागणीनुसार शनिवारी १ मार्च रोजी मधुबन चित्रपटगृहात डोंबिवलीकर प्रेक्षकांकरता 'छावा 'चित्रपट मोफत दाखविण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदारसंघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांनी याचे आयोजन केले होते. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा व छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याकरिता आपले बलिदान कसे दिले हे चित्रपटातून पहावे, असे आमदार मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चित्रपट पाहता डोंबिवलीकर प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले.