राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

  


नाशिक : महाराष्ट्र लगोरी असोसिएशन व पुणे जिल्हा लगोरी असोसिएशन आयोजित नववी ज्युनियर लगोरी अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथील वरवंट नागनाथ माध्यमिक विद्यालय वरवंट येथील मैदानावर उत्साह संपन्न झाली, त्यामध्ये प्रथम क्रमांक पालघर ,द्वितीय क्रमांक वाशिम ,तृतीय क्रमांक नासिक,चतुर्थ क्रमांक रायगड तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक पुणे,जिल्हा दुतीय क्रमांक पालघर,तृतीय क्रमांक बुलढाणा, 

व चतुर्थ क्रमांक नाशिक यांनी मिळवल्याबद्दल यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राहुल दादा दिवेकर – संचालक, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ संजय भाऊ जाधव – उद्योजक,दत्तात्रय दिवेकर – सरपंच, वरवंड,प्रदीप दिवेकर – उपसरपंच, वरवंड,चवळे साहेब – तालुका क्रीडा अधिकारी,डॉ. विजय दिवेकर – VGSS व जिल्हा सचिव व क्रीडा शिक्षक,क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते या स्पर्धेत एकूण१५ जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये,रायगड, पुणे (ग्रामीण), बुलढाणा, नाशिक, पुणे (शहर), पालघर, वाशिम, संभाजीनगर आणि अहिल्यनगर — उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व खेळाडूंनी अपूर्व शक्ती, कौशल्य आणि उत्कृष्ट रणनिती सादर करत आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवली.

 राज्यस्तरीय स्पर्धेतील निकाल 

मुले प्रथम क्रमांक : पालघर,द्वितीय क्रमांक : वाशिम, तृतीय क्रमांक : नाशिक,चतुर्थ क्रमांक : रायगड 

मुली प्रथम : पुणे, द्वितीय क्रमांक : पालघर, तृतीय क्रमांक : बुलढाणा, चतुर्थ क्रमांक : नाशिक 


विजयी संघाला महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, सुभाष शिर्के – उपाध्यक्ष,तुषार व्ही. एम. जाधव – सदस्य, ,किरण पाटील – कोषाध्यक्ष, शैलेन्द्र पोटनीस – सदस्य, सचिन येरुणकर – सदस्य,हेमंत पायर – सदस्य, सोनाली  मालुसरे – सदस्य, राजेंद्र पाटील – तांत्रिक संचालक, केतन भास्कर, प्रविण जाधव – महाराष्ट्र लगोरी संघाचे प्रशिक्षक यांनी पुढील वाटचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post