दिवा \ आरती परब : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवा भावी संस्था, दिवा शहर याचा तीसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. वर्धापन दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा, महिलांसाठी हळदी- कुंकू आणि खेळ पैठणीचा तर सिंधुदुर्ग वाशियांची दशावतारी पौराणिक नाटक सत्वपरीक्षा नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलनाचा कार्यक्रम संस्थेचे आधारस्तंभ माजी नगरसेवक अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. त्यावेळी दिवा शहरातील मान्यवर विजय भोईर, रोहिदास मुंडे, जयदीप भोईर आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला निलेश पाटील, अर्चना निलेश पाटील, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, प्रशांत गावडे, शैलेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यावेळी मान्यवरांना आणि संस्थेतील मुख्य सदस्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला दिवा शहरातील सिंधुदुर्ग वाशियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष नितिन कोरगांवकर, कार्याध्यक्ष सचिन गोसावी, उपाध्यक्ष रवि मुननकर , सरचिटणीस समीर चव्हाण, संपर्क प्रमुख गोविंद मामा घाडीगांवकर, विठ्ठल गावडे, दीपक घाडी, विनोद घाडी, प्रकाश घाडीगांवकर, भानुदास घाडीगांवकर, लवू गुरव, नंदू धुरी, सुदेश जाधव, सत्यवान परब, अनंत पडेलकर आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.