मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टद्वारे कोहलीने आपली ही ऐतिहासिक निवृत्ती जाहीर केली.
१४ वर्षांची कसोटी कारकीर्द- एक झगमगती प्रवास
२०११ साली वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण करताना कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल टाकले होते. पुढील १४ वर्षांत त्याने १२३ कसोटीत ९,२३० धावा केल्या, ज्यात ३० शतके आणि ३१ अर्धशतके सामाविष्ट आहेत. फलंदाज म्हणून त्याचे सातत्य, आत्मविश्वास आणि दबावात खेळण्याची क्षमता ही भारतीय संघासाठी अमूल्य ठरली.
यशस्वी कर्णधार - कसोटी क्रिकेटला दिली नवी ओळख
कोहलीने ६८ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यात ४० सामन्यांमध्ये विजय मिळवून त्याने भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मान पटकावला. कोहलीच्या नेतृत्वात भारताने परदेशातही विजय मिळवले.
भावनिक निरोप
"कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणे सोपे नाही, पण आता हा निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. या खेळाने मला खूप काही दिले आहे, आणि मी देखील माझा सर्वोत्तम खेळ केल्याचे कोहलीने म्हटले आहे.
एकदिवसीय आणि आयपीएल कारकीर्द सुरूच
सध्या कोहलीने एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. विराट सध्या IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळत आहे. मात्र कसोटीमधून त्याच्या निवृत्तीमुळे चाहत्यांना एक पोकळी नक्कीच जाणवेल.
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
पदार्पण वर्ष: २०११
कसोटी सामने : १२३
धावा: ९,२३०
शतके: ३०
कर्णधार म्हणून विजय: ४०