नवी मुंबई : भारताच्या सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतून भारताचे रक्षण व्हावे आणि भारताला विश्वगुरु बनण्याचा मार्ग सुकर व्हावा यासाठी “अंतर योग फाउंडेशन”तर्फे आयोजित भव्य “गणेश विद्या महायज्ञ” सोहळा रविवारी ११ मे २०२५ रोजी, सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे आचार्य उपेन्द्रजी यांच्या नेतृत्वाखाली तो संपन्न झाला.“सध्याच्या परीस्थ्तीचे संकेत दोन वर्षांपूर्वीच मिळणे सुरु झाले होते, मात्र त्यासाठी योग्य ते अध्यात्मिक उपचार पार पाडले गेले आणि त्यातून भारत सामर्थ्यशाली होईल हे पाहिले गेले,” असे उद्गार यावेळी आचार्य उपेंद्रजी यांनी काढले.
यावेळी आचार्य उपेंद्रजी यांच्या लेखणीतून साकारलेल्या, जगातील सर्वात सखोल व विस्तृत अशा 'गणेश अथर्वशीर्ष विश्लेषणासहित' या ग्रंथाचे तसेच 'ज्ञानमोती या पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय मातृदिनाचे औचित्य साधून आगळ्या पद्धतीने श्री निखिलानंद सरस्वती महाराज , श्रीमहंत डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ महाराज आणि महंत सुधीर दास पुजारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.‘अंतर योग फाउंडेशन’तर्फे या दिवसभर चाललेल्या उत्सवात आयुष्यभराचा दिव्य अनुभव देणारे ५ कोटी गणेश बीज मंत्रांचे जप आणि २ लाख वैयक्तिक साधना पूर्ण केली गेली. आचार्य उपेन्द्रजी व जगभरातील अंतर योग साधकांनी सध्याच्या कठीण परिस्थितीतून भारताचे रक्षण करण्याचा संकल्प यावेळी केला.
“आज आपण जी आव्हानात्मक परिस्थिती अनुभवतो आहे, त्याचे संकेत दोन वर्षांपूर्वीच मिळाला होते. त्यानंतर विघ्नहर्ता गणपती बाप्पाची उपासना मंत्रात्मक पद्धतीने आम्ही सुरु केली. २०२४ पासून तब्बल ५ कोटी मंत्र २५० साधकांच्या माध्यमातून म्हटले गेले. प्रत्येक साधक २ लाख मंत्र म्हणत असे. देशाला चांगली स्पंदने मिळवीत आणि नेत्यांना देशाचे नेतृत्व करताना शक्ती प्राप्त व्हावी, युवक शक्तिशाली बनावेत आणि त्यातून त्याना लढण्यासाठी बळ प्राप्त व्हावे, यासाठी हे आयोजन केले गेले होते,” असेही आचार्य उपेंद्रजी यांनी म्हटले.
आचार्यजी पुढे म्हणाले,“तब्बल दोन हजार वर्षांपूर्वी अगस्त्य मुनींनी नाडी ग्रंथ लिहिला होता आणि त्यात त्यांनी या मंत्रांबद्दल नमूद केले आहे. या महायज्ञमध्ये जे सामील झाले त्यांच्या समस्या केवळ ४८ दिवसांमध्ये दूर होतात. आम्ही एक दिवसाच्या या आयोजनामध्ये शिवसाधना आयोजित केली होती. जपयज्ञ केला. आहुती अभिषेक केला. शिवसाधना केली. त्यातून तत्काळ रोगनिवारण होते. आम्ही जे गणेश अथर्वशीर्ष सादर केले ते सर्वात विस्तृत असे आहे. या भव्य अशा आयोजनात साधू, संत, महंतांनी सहभाग नोंदविला.”‘अंतर योग फाउंडेशन'तर्फे आयोजित 'गणेश विद्या महायज्ञ हा एक ऐतिहासिक महासोहळा आयोजित केले गेला. भारताच्या सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतून भारताचे रक्षण व्हावे यासाठी आचार्य उपेन्द्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वगुरु बनविण्यासाठीचा "गणेश विद्या महायज्ञ सोहळा संपन्न झाला.