मोफत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ

 


डोंबिवली \शंकर जाधव : लेवा युथ फोरम डोंबिवली शहर आणि केंद्रीय संस्था आयोजित व लेवा पाटीदार समाज मंडळ डोंबिवली यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर रविवार 1 जून रोजी लेवा पाटील भवन येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी लेवा युथ फोरम चे डोंबिवली अध्यक्ष अतुल महाजन, सचिव सोहम कोल्हे, लेवा पाटीदार समाज मंडळ डोंबिवली अध्यक्ष दिगंबर पाटील , सचिव सुभाष राणे, खजिनदार सतीश लोखंडे, लेवा युथ फोरम केंद्रीय कार्यकारणी अध्यक्ष हर्षद भंगाळे व तर पदाधिकारी उपस्थित होते. 

   या आरोग्य शिबिरात नाक कान घसा तपासणी, हाड व सांधे तपासणी, नेत्र तपासणी ,दंत तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, फिजीओथेरपी तपासणी, कायरो थेरपी तपासणी, लहान मुलांची तपासणी, पचन(वचन प्रक्रियेची तपासणी), स्त्रियांना होणाऱ्या आजार आजाराची तपासणी आजार संबंधी तपासणी, न्यूरोलॉजिस्ट, हृदयरोग , जनरल शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया ,बायपास शस्त्रक्रिया, अपेंडिक्स शस्त्रक्रिया, करणे या शस्त्रक्रिया मुतखडा शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेरी कोज शस्त्रक्रिया, गुडघा बदलणे शस्त्रक्रिया, ऑर्थोपेटीक शस्त्रक्रिया, मुळव्याध शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, युरो सर्जरी शस्त्रक्रिया, त्वचारोग केसांविषयीची समस्या याची माहिती देण्यात आली. डोळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना साठी मोफत उपचार होते. तसेच कांस्यखाली फूट मसाज देण्यात आले.यावेळी डॉ.तेजस सावदेकर म्हणाले,प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यायाम, योग्य जेवण,नियमित आरोग्य तपासणी करावी.दातांचे डॉ. सुमित फिरके म्हणाले, दातांच्या आरोग्याविषयी गैरसमज आहेत.दंतचिकित्सा काय आहे हेच लोकांना माहित नाही. याची माहिती व जनजागृती होणे आवश्यक आहे.दिवसातून दोन वेळा दात घासल्याने बरेचसे दातांचे आजार होत नाहीत. डॉ. विशाखा जंगले म्हणाल्या, पावसाळ्यात घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावे. त्यामुळे रोगाची लागण होत नाही.



Post a Comment

Previous Post Next Post