धुळे : प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत साक्री तालुक्यातील नवापाडा येथील शासकीय आश्रमशाळेत एक भव्य लाभवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला आदिवासी समाजाच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, शेकडो लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
कार्यक्रमातील ठळक मुद्दे:
- रहिवासी दाखले, जन्म दाखले, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड, जिवंत सातबारा, शालेय साहित्य वाटप
- वनविभागामार्फत मोफत वृक्षवाटप
- आरोग्य विभागामार्फत सिकलसेल चाचणी व आरोग्य तपासणी
- “एक पेड मा के नाम” उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच संजय गांगुर्डे होते. यावेळी त्यांनी अभियानाद्वारे शासन थेट जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. हितेंद्र गायकवाड (तालुका आरोग्य अधिकारी), आर.एम. पवार (शाखा अभियंता), सुरेश ठाकरे (उपसरपंच), श्रीमती जे.पी. देवरे, डी.आर. पाटील, डॉ. दशपुते, डॉ. विलास सोनार, वनपाल कल्पेश लांडगे, मंडळ अधिकारी राजेश गांगुर्डे, पोलीस पाटील छोटीराम बहिरम, समग्र शिक्षेचे चुनीलाल पाटील, ग्रामसेवक व्ही.टी. पवार आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील व व्ही.आर. पाटील, तर आभारप्रदर्शन प्राचार्य व्ही.ए. खैरनार यांनी केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी अनुसूचित जमातीतील सर्व पात्र घटकांनी या अभियानांतर्गत विविध शिबिरांत सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.