डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावलेला “माय मरो… मौसी जगो!” बॅनरची शहरात चर्चा सूरू झाली आहे. मराठी भाषेवरील वाढता अन्याय, मुंबईतील मराठी लोकसंख्येचा घटता टक्का, आणि शिक्षण संस्थांमधील हिंदी सक्ती यावर या बॅनरद्वारे थेट आणि परखड भाष्य करण्यात आले आहे.
एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनरची चर्चा रंगली आहे.