सपना रोशन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जनसेवा उपक्रमांचे आयोजन


दिवा \ आरती परब: भारतीय जनता पक्षाच्या दिवा महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून प्रेरित होत विविध जनहितकारी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. "जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा" या तत्त्वाशी निष्ठा बाळगत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमांतर्गत युवा रोजगार मेळावा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, असंघटित कामगार कार्ड वाटप, ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, तसेच अधिवास प्रमाणपत्र (Domicile) वाटप यांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांद्वारे नागरिकांना आवश्यक त्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या उपक्रमांचे आयोजन व यशस्वी संचालन सपना भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी निस्वार्थ भावनेने केले. या कार्यक्रमात दिवा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमांचा लाभ घेतला आणि सपना भगत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रमेश भोईर, गणेश भगत, धर्मेंद्र शेलार, नितीन कोरगांवकर, रवी मुणंनकर, विठ्ठल गावडे, सतिश केळशीकर, जयदीप भोईर, समीर चव्हाण, किरण कोरगांवकर, अशोक गुप्ता, राहुल साहू, गौरीशंकर पटवा, जिलाजीत तिवारी, प्रफुल साळवी, उदय सावंत, स्वप्नील धुमाळ, पंकज सिंग, विरेंद्र गुप्ता, विशाल गुप्ता, तसेच महिला मोर्चातील सर्व सहकारी व दिवा भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांमुळे दिवा परिसरात सामाजिक जाणीव व एकोप्याची भावना दृढ झाली असून सपना भगत यांच्या नेतृत्वातील अशा उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post