दिवा शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणार


शिवसेना युवती सेनेतर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात शहरप्रमुख रमाकांत मढवी यांचे आश्वासन

दिवा \ आरती परब : धर्मवीर आनंद दिघेंनी सुरुवात केलेली दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची सराव परीक्षा दिव्यात ही घेतली जाते. त्याला दिवा शहरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यातच वेळोवेळी अडचणींना सामोरे जाऊन जास्तीत जास्त टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिवसेना युवतीसेने मार्फत गेली पाच वर्षे सत्कार होत आहे. तर तसाच आजच्या शिवसेना युवती सेनेतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात दिवा शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणार असे आश्वासन दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी विद्यार्थ्यांना दिले. 

महाराष्ट्राचे यशस्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कायसम्राट, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून व शिवसेना शहरप्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवतीसेना शहराधिकारी साक्षी रमाकांत मढवी यांच्यावतीने दिवा शहरात दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पाचवा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला दिवा शहरातील ५०० पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.


यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगितले की, शिवसेना दिवा शहर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच शालेय विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षभर अनेक कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेतले जातात, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतली जाते त्याला दिवा शहरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मढवी यांनी सांगितले. दिवा शहरातून ९६ टक्के गुण मिळवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना यावेळी विशेष सत्कार केला व या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी ५१०००/- रुपयांचे साह्य करण्यात आले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळे दिवा शहराचे नावलौकिक वाढत असून अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी दिवा शहरात लवकरच एक अभ्यासिका सुरू करणार असल्याचे मत रमाकांत मढवी यांनी व्यक्त केले. 

दिवा शहरात तरुण तरुणींसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या युवती सेना शहराधिकारी साक्षी मढवी हिचे शिवसेना उपशहरप्रमुख ॲड. आदेश भगत यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले व दरवर्षी न चुकता असा मोठा गुणगौरव सोहळा आयोजित करणाऱ्या या तरुण नेतृत्वाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करण्याचे आव्हान यावेळी उपस्थित तरुणींना केले. या कार्यक्रमाला शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील, गणेश मुंडे, ऍड आदेश भगत, माजी नगरसेवक दिपक जाधव, अमर पाटील, सौ दीपाली भगत, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, उमेश भगत, शशिकांत पाटील, गुरुनाथ पाटील, राजेश पाटील, जगदीश भंडारी, सचिन चौबे, अर्चना पाटील, सरिता मढवी, सुविता मढवी, शिवसेना शाखाप्रमुख, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




Post a Comment

Previous Post Next Post