माजी नगरसेवक शैलेश पाटील यांचा उपक्रम
दिवा \ आरती परब : एन. आर. नगर, दिवा (पश्चिम) येथे सालाबादप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने जनतेच्या सेवेसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमावेळी शिवसेना शाखा प्रमुख सुनिल कांबळे, उपशाखाप्रमुख मनोज महाराणा, विलास पांचाळ, जयराम गावकर, गोपी वालेकर, सुधाकर मोरे, सुरेश गावडे, गणेश सावंत, महिला संघटक सविता शिंदे, शोभा कांबळे, निकिता वाघमारे, सुचिता सावंत, गीतांजली महाराणा, भिमाबाई चौधरी, मनीषा कांबळे, रामराज शिंदे, संस्कृती तेली, लक्ष्मी सावंत यांच्यासह शिवदूत पथकाचे कार्यकर्ते आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. लोकांनी नगरसेवक शैलेश पाटील यांचे आभार मानत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
