एखाद्या चित्रकाराने जणू पृथ्वी रेखाटली ...


अंतराळातून शुमांशू यांनी व्यक्त केल्या भावना


नवी दिल्ली : भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करत आहेत. नासाच्या फॉल्कन-९ या यानातून गेलेल्या शुभांशू शुक्ला यांनी इतर अंतराळवीराबरोबर अंतराळातील रोमांच शेअर केला. एक्सिओम स्पेसने एक्स वर हा व्हिडिओ शेअर करीत शुभांशू आपला अनुभव सांगितले. 

ॲक्सिऑम-४ मोहिमेअंतर्गत अन्य तीन अंतराळवीरांबरोबर शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी अवकाशात उड्डाण केले. शुभांशू यांनी अंतराळातून पाहिला संदेश पाठवला. नमस्कार, फ्रॉम स्पेस… माझ्या प्रिय देशवासीयांनों, काय विलक्षण प्रवास आहे. ४१ वर्षानंतर पुन्हा अंतराळात. हा रोमांचक अनुभव आहे. अंतराळवीराच्या माझ्या पोशाखावर भारताचा तिरंगा ध्वज आहे. तो मला सतत आठवण करु देत आहे की, मी तमाम भारतीयांपैकी एक आहे. माझ्या देशातील १.४ अब्ज लोकांचा पाठिंबा मला मिळतो. माझ्या माध्यमातून तुम्हीसुद्धा या प्रवासाचा आनंद घ्या.




शुभांशू यांनी म्हटले की, अंतराळ प्रवास माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. अंतराळात उड्डानानंतर जेव्हा मी पृथ्वीकडे पाहिले तेव्हा वाटले, एखाद्या चित्रकाराने निळा आणि हिरवा रंग मिळून कॅनवास तयार केला आहे. मायक्रोग्रॅव्हीटीमध्ये जाणे मजेशीर अनुभव आहे. लॉन्चच्या दहा मिनिटांत ड्रॅगन यान रॉकेटपासून वेगळा झाला. त्यावेळी खिडकीतून मी सूर्याचे तेज आणि तारे पाहिले. हे सर्व माझ्यासाठी अविश्वसनीय होते. मी माझ्या क्रू मेंबरसोबत हसलो, विनोद केले. काही योगासनेही केली. स्ट्रॉने पाण्याचे पाउच पिणे थोडे कठीण आहे. पण ते देखील मजेदार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post