'कांटा गर्ल’ शेफाली जरीवालाचे निधन

 


कार्डियाक अरेस्टमुळे घेतला अखेरचा श्वास

मुंबई  \ कविता गरुड : मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे तिचं निधन झाल्याचं समोर आलंय. शेफाली जरीवाला ‘कांटा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजेच शिक्षण सुरु असतानाच शेफालीला आयुष्यातील पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एका डान्सपासून सुरू झालेला तिचा प्रवास बॉलिवूड आणि रिअ‍ॅलिटी शोजच्या जगापर्यंत घेऊन गेला होता.

शेफाली जरीवालाने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्या Academicians च्या कुटुंबातून येतात. याचा अर्थ त्यांच्या घरात अभ्यासाचा, शिक्षणाचा खूप माहौल होता. अशा परिस्थितीत ग्लॅमरच्या जगात येणं आणि स्वतःची खास ओळख निर्माण करणं हे अगदी सोपं नव्हतं. शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर प्राथमिक तपासात कार्डियाक अरेस्टचं कारण समोर आलं आहे.

एका इंटरव्यूमध्ये शेफालीने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले होते की, “कांटा लगा गाणं केल्यानंतर लोकांनी मला विचारलं, मी जास्त काम का करत नाही. पण खरं कारण हे होतं की, आकडीच्या समस्येमुळे मी जास्त काम करु शकत नव्हती. मला माहित नसायचं की, पुढचा अटॅक मला कधी येईल”


मागच्या नऊ वर्षांपासून ती आकडी मुक्त झाली आहे. तिला आता असे अटॅक येत नाहीत” इमोशनल सपोर्टमुळे हे शक्य झाल्याच तिने सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणालेली की, “मला स्वत:वर गर्व आहे. मी माझं डिप्रेशन, पॅनिक अटॅक आणि एंग्जायटीला नैसर्गिक मजबूत सपोर्ट सिस्टिमच्या मदतीने मॅनेज केलय”


शेफालीने अनेक कार्यक्रमांमध्ये नोंदवलेला सहभाग

शेफालीला सर्वात आधी 'काँटा लगा' गाण्यातून लोकप्रियता मिळाली. २००८ साली शेफाली बुगी-वुगी कार्यक्रमातही सहभागी झालेली. तिने २०२५ अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग आणि शेफाली हे दोघे 'नच बलिए' या डान्स रिॲलिटी शोमध्येही सभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या पाचव्या आणि सातव्या पर्वात दोघेही सहभागी झालेला. त्याचप्रमाणे मध्यंतरी शेफाली अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १३'मध्येही सहभागी झाली होती.

शेफालीने सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्राचा प्रमुख भूमिका असलेल्या 'मुझसे शादी करोगी' चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. २०१८ मध्ये शेफाली अल्ट बालाजीची वेब सिरीज 'बेबी कम ना'मध्ये झळकली होती. तिने या वेब सिरीजमध्ये श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर करताना मुख्य भूमिका बजावली होती.



Post a Comment

Previous Post Next Post