मध्य रेल्वे मार्गावरील जलद गाड्या धीम्या मार्गावर धावणार
सीएसएमटीहून बेलापूर, पनवेलकडे जाणारी सेवा बंद राहणार
मुंबई \ कविता गरुड : मुंबईकरांचे उद्या रविवारी मेगाहाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेसह रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर पनवेल ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर (पोर्ट लाइन वगळून) मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वेवर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित सुटणाऱ्या अप जलद व अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील. थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तर कल्याणहून मेल/एक्सप्रेस ठाणे-विक्रोळी स्थानकादरम्यान ६व्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉकचा कालावधी असेल. ब्लॉक कालावधीत पनवेलहून सीएसएमटीसाठी सुणाऱ्या अप हार्बर लाइन सेवा सीएसएमटीहून बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाइन सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल येथून सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाइन सेवा आणि ठाणे येथून सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर लाइन सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. तर ठाणे-वाशी/ नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स-हार्बर सेवा उपलब्ध राहतील.
.jpeg)
