भोईर जिमखान्याचे राष्ट्रीय स्पर्धेत डंका



  उत्तराखंडमध्ये सुवर्ण कामगिरी


डोंबिवली \ शंकर जाधव : देहरादून, १० ऑगस्ट २०२५ – उत्तराखंडच्या देहरादून येथे ८ ते १० ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या ऑल एज ग्रुप ट्रॅम्पोलिन व टम्बलिंग जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मध्ये भोंईर जिमखान्याचे खेळाडूंनी महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व यश संपादन केले. विविध वयोगटात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

भोईर जिमखानाच्या यशामागे  मुकुंद भोंईर व  रमेश पाटील यांचे पाठबळ आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा हा मजबूत पाया आहे. त्याचबरोबर प्रशिक्षक नंदकिशोर तावडे व रवींद शिर्के यांच्या काटेकोर प्रशिक्षणामुळे ही भव्य कामगिरी शक्य झाली.

महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून कृष्णा घोटेकर आणि  अनीता जाधव यांनीही या यशात मोलाची भूमिका बजावली. स्पर्धेत खेळाडूंना मार्गदर्शन, नियोजन आणि मानसिक तयारी यासाठी त्यांनी दिलेला वेळ व मेहनत अत्यंत महत्त्वाची ठरली.




भोंईर व्यायामशाळेच्या पदक विजेत्यांची यादी –

 आर्य अरुण दलवी (ज्युनियर) – संघ सुवर्ण पदक (ट्रॅम्पोलिन पुरुष गट)

चिन्मय प्रताप पाटील (सीनियर) – संघ कांस्य पदक (ट्रॅम्पोलिन पुरुष गट)

जस्मिन प्रविण वजा (सीनियर) – संघ कांस्य पदक (ट्रॅम्पोलिन पुरुष गट)

आरोही पवन भोंईर (मिनी गट) – संघ रौप्य पदक (ट्रॅम्पोलिन महिला गट)

चित्रली रखमा जी सोनवणे (ज्युनियर) – वैयक्तिक रौप्य पदक (ट्रॅम्पोलिन महिला गट)

मौली बाळ (सीनियर) – वैयक्तिक रौप्य पदक + संघ सुवर्ण (ट्रॅम्पोलिन महिला गट)

राही नितीन पाखळे (सीनियर) – वैयक्तिक सुवर्ण पदक + संघ सुवर्ण (ट्रॅम्पोलिन महिला गट)

सेजल सुहास जाधव (सीनियर) – ऑल राऊंड रौप्य पदक + संघ सुवर्ण (ट्रॅम्पोलिन महिला गट)

मानस श्रीधर घोडेकर (सीनियर) – ऑल राऊंड रौप्य पदक (टम्बलिंग पुरुष गट)

आर्या राजू नागांवकर (सब-ज्युनियर) – वैयक्तिक सुवर्ण पदक (टम्बलिंग महिला गट)

पियुषा वैभव केळकर (सब-ज्युनियर) – वैयक्तिक कांस्य पदक (टम्बलिंग महिला गट)

इतर खेळाडूंमध्ये – देविका संदीप शहारे, गर्गी संजय पाटील, सान्वी सदानंद नायक, आरव दिवाकर बावकर, मयुरेश महेश वर्तक, श्रेयांक संदीप शेनॉय – यांनीही उत्तम खेळ करून अनुभवाची श्रीमंती मिळवली.

भोंईर व्यायामशाळेची पदक संख्या:

🏅 सुवर्ण पदके – ५

🥈 रौप्य पदके – ६

🥉 कांस्य पदके – ३

भोंईर जिमखाना आज राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात केवळ उत्कृष्ट खेळाडू घडवणारीच नव्हे तर शिस्त, मेहनत आणि दर्जेदार प्रशिक्षण यांचा आदर्श नमुना ठरत आहे.महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढविण्यासाठी ही कामगिरी एक मोठा टप्पा ठरली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post