सातपुडा जंगल सफारी पर्यटन, रोजगार आणि निसर्गसंवर्धनाचा नवा अध्याय!

Maharashtra WebNews
0



रावेर तालुक्यात ‘सातपुडा जंगल सफारी’चे भव्य उद्घाटन 


रावेर (जळगाव) :  उत्तर महाराष्ट्रातील पहिली आणि ऐतिहासिक अशी 'सातपुडा जंगल सफारी' योजना आज रावेर तालुक्यातील पाल या गावात प्रत्यक्षात उतरली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या जंगल सफारीचे भव्य उद्घाटन झाले. या वेळी मंत्री पाटील यांनी तब्बल दीड तास जंगल सफारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि परिसरातील निसर्ग वैभवाचे निरीक्षण केले.


सातपुडा जंगल सफारी ही केवळ एक पर्यटन योजना नाही, तर ही सातपुड्याचा आत्मा जपणारी, स्थानिक संस्कृतीला उजाळा देणारी संकल्पना आहे," असे भावनिक उद्गार मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. पुढे बोलताना त्यांनी स्थानिक तरुणांना आवाहन केले की, "छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी, गाईड सेवा अशा स्वरूपात स्वतःचा रोजगार तयार करावा." प्रत्येक कुटुंबाने आयुष्यात एकदा तरी येथे येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा, कारण हा श्वास आहे, जगण्याचा आनंद शिकवतो," असेही त्यांनी सांगितले.


सातपुडा जंगल सफारीसाठी एका वाहनाचे तिकीट ₹२,५०० इतके असून, गुलाबराव पाटील यांनी स्वतः पाच हजार रुपये देऊन दोन सफारी गाड्यांचे बुकिंग केले, आणि त्यामुळे पहिले अधिकृत पर्यटक म्हणून नोंद झाली. दीड तासांच्या या सफारीत मंत्री पाटील यांच्यासोबत आमदार, वरिष्ठ वन अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी सहभागी होते. सातपुडा जंगल सफारीसाठी एका वाहनाचे तिकीट ₹२,५०० इतके असून, गुलाबराव पाटील यांनी स्वतः पाच हजार रुपये देऊन दोन सफारी गाड्यांचे बुकिंग केले, आणि त्यामुळे पहिले अधिकृत पर्यटक म्हणून नोंद झाली. दीड तासांच्या या सफारीत मंत्री पाटील यांच्यासोबत आमदार, वरिष्ठ वन अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी सहभागी होते.




ही सफारी पुढील टप्प्यात आणखी सुविधा, पर्यटक निवास, शाळांसाठी निसर्गशिक्षण केंद्र अशा प्रकारे विस्तारणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरण पर्यटनाचा प्रसार आणि स्थानिकांना रोजगारनिर्मिती अशा त्रिसूत्री उद्दिष्टांवर आधारित ही योजना उत्तर महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार आहे. सातपुड्याच्या कुशीत निसर्ग आणि संस्कृती यांचा संगम साधणारी ही सफारी भविष्यात राष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.


 सातपुडा अभयारण्यातील विशेष आकर्षण बिंदू

पाल जंगल सफारीमध्ये पर्यटकांना खिळवून ठेवणारी विविध ठिकाणे विकसित करण्यात आली आहेत:

  • लेक व्ह्यू पॉइंट: डोंगराच्या उंचीवरून तलावाचे विहंगम दृश्य आणि पक्षी निरीक्षणासाठी उपयुक्त.

  • इको हट पॉइंट: बांबू आणि नैसर्गिक साहित्याने बनवलेल्या झोपड्यांमध्ये विश्रांतीची सोय.

  • सनसेट पॉइंट: सूर्यास्ताचे मोहक दृश्य पाहण्यासाठी आदर्श ठिकाण, फोटोप्रेमींसाठी पर्वणी.

  • वाघडोह क्षेत्र: वाघ, बिबट्या आणि इतर वन्यजीवांचा अधिवास – साहसी आणि वन्यप्रेमींसाठी रोमांचकारी अनुभव.

२.५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा पूर्ण

सातपुडा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे ₹२.५ कोटी रुपयांच्या खर्चात पूर्ण करण्यात आला असून, यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  • प्रवेशद्वार आणि आतील रस्ते

  • ५ जंगल सफारी वाहने

  • १८ प्रशिक्षित गाईड व चालक

  • बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर व पर्यटकांसाठी सुविधा




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)