मालेगाव महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात ४ नगरसेवक


२१ प्रभागाचे भवितव्य ८४ नगरसेवकांच्या हाती

मालेगाव : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी मालेगाव महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. या आराखड्यानुसार महापालिकेअंतर्गत एकूण २१ प्रभाग असणार असून, प्रत्येक प्रभागातून ४ नगरसेवक निवडून येतील. अशा प्रकारे एकूण ८४ नगरसेवक पुढील पाच वर्षे नागरिकांचा काभाराचा गाडा हाकणार आहेत.


२०१७ च्या धर्तीवर रचना

२०१७ मधील निवडणूक रचनेच्या धर्तीवरच यंदाची प्रभाग रचना करण्यात आली आहे. ही रचना २०११ च्या जनगणनेवर आधारित असून, प्रभागांचे आरक्षण लॉटरी पद्धतीने लवकरच निश्चित केले जाणार आहे. नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.


राजकीय समीकरणांना वेग

मालेगाव शहर मुस्लीमबहुल असून, येथे दोन विधानसभा क्षेत्रे आहेत.

मालेगाव मध्यचे प्रतिनिधित्व एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती करत आहेत.

मालेगाव बाह्य विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व शिंदे गटाचे मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आहे.

याशिवाय कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, जनता दल, शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि स्थानिक विकास आघाड्या आगामी निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.


प्रतिष्ठेची लढत

आगामी निवडणुकीत महापालिकेत बहुमत मिळविण्यासाठी विविध पक्ष झटणार आहेत. दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या लढतीत पणाला लागणार आहे. त्यामुळे मालेगावची निवडणूक केवळ स्थानिकच नाही, तर राज्याच्या राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाची ठरणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post