दिवा विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संयुक्त बैठक
दिवा \ आरती परब : ठाणे महानगर पालिकेतील वाढता भ्रष्टाचार, टँकर माफिया, ट्रॅफिकचा त्रास, जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेले अन्यायकारक कारभार या सगळ्यां विरोधात आता ठाणेकर एकजूट होऊ लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज दिवा विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीला विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत ठाणे महानगर पालिकेतील प्रशासनातील भ्रष्टाचार, नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळणे, टँकर माफिया आणि ठिकठिकाणी सुरू असलेले गैरव्यवहार यावर तीव्र चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठरवले की “आता हात जोडून नव्हे, तर हात उंचावून न्याय मिळवायचा आहे!”
या लढ्यात ठाणेकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘धडक मोर्चा’ हे ऐतिहासिक जनआंदोलन ठाण्यातून निघणार आहे. या आंदोलनाचा उद्देश ठाणे महानगर पालिकेला भ्रष्टाचारमुक्त, कर्जमुक्त आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवण्याचा आहे. दिव्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की भ्रष्ट सत्तेला गाडायचं, अन्यायाविरुद्ध भिडायचं.. दिवेकरांनी एकदिलाने या आंदोलनात सहभागी व्हावं!सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा येथून गडकरी रंगायतनसमोर, तलावपाळी, ठाणे येथे मोर्चात सहभागी होण्याचं आहे
“ही केवळ मोर्चा नव्हे, ठाणेकरांच्या स्वाभिमानाचा शंखनाद आहे!” यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटील, मनसे शहर प्रमुख तुषार पाटील, शिवसेना युवा शहर संघटिका ज्योती पाटील, मनसे उपशहर अध्यक्ष मोतीराम दळवी, सचिव प्रशांत गावडे, कुशाल पाटील विद्यार्थी सेना शहराध्यक्ष मनसे, देवेंद्र भगत मनसे विभाग अध्यक्ष, प्रकाश पाटील विभाग अध्यक्ष मनसे, हेमंत नाईक विभाग प्रमुख शिवसेना, संजय जाधव विभाग प्रमुख शिवसेना, शैलेंद्र कदम उप विभाग अध्यक्ष, परेश पाटील विभाग सचिव शाखाध्यक्ष, विराज पाटील शाखाध्यक्ष, महादेव पाटील शाखाध्यक्ष, रुपेश नाईक शाखाध्यक्ष, शशिकांत खसासे शाखाध्यक्ष, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.